Rain Alert Agrowon
ताज्या बातम्या

Rain Alert: दक्षिण कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली (IMD) आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : राज्यात उघडीप असलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ४) दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा (Monsoon) आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम असून, ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

पावसाच्या उघडिपीमुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल किमान तापमानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा ( यलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नंदूरबार धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

राज्यात बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :सुधागडपाली, जव्हार प्रत्येकी ५०, अंबरनाथ ४०, रामेश्वर कृषी, उल्हासनगर, मालवण, देवगड, विक्रमगड, उरण, हर्णे प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :पेठ ३०, इगतपुरी, सोलापूर, बार्शी, माढा प्रत्येकी २०.

मराठवाडा : लोहारा, परांडा प्रत्येकी ३०, उमरगा २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT