Jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामाची पूर्तता करणारे गाव हरघर जल घोषित

जलजीवन मिशन या योजनेच्या निकषानुसार सर्व घराना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणीद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Solapur News जिल्ह्यातील ज्या गावात जलजीवन मिशनचे (Jal Jeevan Mission) काम पूर्ण झाले आहे. ते गाव हरघर जल घोषित करणे. तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) च्या निकषाची पूर्तता केल्यास ग्रामसभा घेऊन बैठकीत ठराव करण्याची सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये घेण्यात आला. श्री. कोहिनकर म्हणाले, जलजीवन मिशन या योजनेच्या निकषानुसार सर्व घराना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणीद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करणे आवश्यक आहे.

त्यानुसार संबंधित गावात पडताळणी करण्यात येत आहे. त्याशिवाय गावात हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) निकषातंर्गत गावातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास गावात ग्रामसभेत ठराव पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

Citrus Spider Mite Infestation: लिंबूवर्गीय पिकांवरील जाळी-विणणारा कोळी

Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार

SCROLL FOR NEXT