Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास जैसे थे!

राज्याच्या बहुतांश भागात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात आज हलक्या ते मध्यम् स्वरुपाच्या सरी पडल्या. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

राज्याच्या बहुतांश भागात काल रात्री जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. काही भागात आज हलक्या ते मध्यम् स्वरुपाच्या सरी (Rainfall) पडल्या. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दुसरीकडं माॅन्सूनने (Monsoon Return Journey) आजही परतीचा प्रवास केला नाही.

तर हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वीजासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाने झोडपल्यामुळे कापूस, सोयाबीन, मका पिकांचं नुकसान झालं आहे. माॅन्सूनच्या परतीचा प्रवास आजही थांबला होता.

माॅन्सूनच्या परतीची सीमा कैलाशहर, बेरहामपूर, कानके, विलासपूर, ब्रम्हपुरी, बुलडाणा, डहाणून या भागात कायम आहे. माॅन्सून विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि संपूर्ण पश्चिम बंगालच्या काही भागातून माॅन्सून परतण्यास पुरक स्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी तर विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा तर मराठवाड्यातील परभणी, लातूर, हिंगोली नांदेड तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात येलो इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT