माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Agrowon
ताज्या बातम्या

Prithviraj Chavan : अर्थव्यवस्थेचे फलित दरडोई उत्पन्नावरून समजते

Team Agrowon

पुणे : कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे फलित हे, त्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न किती आहे, यावरून ठरते. भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) आज पाचव्या क्रमांकावर असली, तरी दरडोई उत्पन्नात आपण १४४व्या क्रमांकावर आहोत. श्रीलंका, बांगलादेशही आपल्यापेक्षा पुढे आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी येथे केले.

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बुधवारी (ता.२८) आयोजित केले होते. यावेळी उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चव्हाण बोलत होते. अध्यक्षपदी खासदार श्रीनिवास पाटील होते. याप्रसंगी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले, सिने अभिनेते भरत जाधव, अशोक समर्थ, लेखक अरविंद जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले,‘‘संभाजी ब्रिगेड ही गेली पंचवीस वर्षे विविध विषय हाती घेऊन प्रभावी काम करत आहे. संघटनेने आता अर्थकारणाच्या नव्या दिशेकडे पाऊल टाकले आहे. एका बाजूला अर्थकारण, तर दुसऱ्या बाजूला सर्वांगीण आणि व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे लोकांची गरज कमी होत आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यासाठी स्वत:ला विकसित केले पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या पातळीवर सुरू राहील, मात्र आरक्षणाबरोबर अर्थकारणाकडेही युवकांनी वळायला हवे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने घेतलेली संकल्पना महत्त्वाची आहे, यानुसार तरुणांनी उद्योग, व्यापार केला पाहिजे.’’

‘‘आजचे शिक्षण हे सुमार झाले असून त्याचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षण संस्थांमधून केवळ पदव्या दिल्या जात आहेत. संशोधनात्मक वृत्ती कमी आहे. जगाच्या शिक्षणाच्या तुलनेत व्हिएतनाम, चीन, सिंगापूर येथील शिक्षण पद्धती पुढे गेली आहे. त्यातुलनेत आपण खूपच मागे असून राष्ट्रीय शिक्षणाच्या तुलनेत सहा टक्के खर्च करायला पाहिजे. परंतु ते आजही चार टक्केच्या पुढे गेलेले नाही,’’ अशी खंत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी,‘संभाजी ब्रिगेडमध्ये तोडणारी नसून जोडणारी लोकं आहेत. काळ बदलत असला, तरी एकोप्याने रहा,’ असा सल्ला दिला. चित्रपट अभिनेते श्री. जाधव, श्री. समर्थ यांनीही आपले विचार मांडले. ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी प्रास्ताविक केले. हर्षवर्धन मगदूम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT