Farmer March agrowon
ताज्या बातम्या

Farmer March : शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटना मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार

Satara-Mantralaya March : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी कराड ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Satara News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सातारा ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

देशात अनेक कायदे हे शेतकरी विरोधी आहे. असे कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेला संत शिरोमणी शेतकरी आठवडी बाजार पुन्हा सुरू करुन शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची परवानगी द्यावी, दोन साखर कारखान्यातील २५ किमीचे हवाई अंतराची अट त्वरीत रद्द करावी. शेतकरी अथवा फार्मर प्रोडूसर कंपनीला ऊसापासून इथेनाॅल निर्मितीचे परवाने मिळावेत, काजूला हमी भाव मिळावा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. कोकणातील बारसू येथिल प्रस्ताविका रिफायनरी प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये भागीदार करुन द्यावे. तसेच सरपंचच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने सकारात्मक विचार करावा, आदी मागण्या रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT