Pune Dam Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढला

Team Agrowon

Pune Rain News : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. काही वेळेस जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढला असला तरी आता तो कमी झाला आहे.

पश्चिमेकडील ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावर कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठवाजेपर्यंत लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक ६३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पश्चिम भागात काही प्रमाणात भात लागवडी सुरू झाल्या आहेत. पूर्व भागातही पेरण्यांना सुरूवात झाली आहे.

परंतु जिल्ह्यात सर्वदूर अद्यापही पाऊस झालेला नाही. त्यातच शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात पावसाची सातत्याने रिमझीम पाऊस होत आहे. मात्र शेतकऱ्यांना अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणक्षेत्रात शुक्रवारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, वडिवळे, गुंजवणी या धरणक्षेत्रातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, आंध्रा, भाटघर, वीर या धरणक्षेत्रात हलक्या सरी बरसल्या.

तर चासकमान, शेटफळ, नाझरे, नीरा देवघर या धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण होते. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या सर्वच धरणक्षेत्रात सुरवातीपासून पाऊस कमी आहे. त्यामुळे या धरणक्षेत्रांत जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

हवेली तालुक्यातील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली या भागात तुरळक सरी बरसल्या. तर मुळशीतील माले मंडळात ३३, मुठे ३३ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगुट भागात तुरळक शिडकावा झाला. भोरमधील भोलावडे २७.५, नसरापूर ११, निगुडघर ४१.५ मिलिमीटर, तर किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर तुरळक सरी पडल्या. मावळमधील काळे कॉलनी १८.५, कार्ला ३०.८, लोणावळा ४६.८, शिवणे १४.८ वेल्ह्यातील वेल्हा ९५.५, पानशेत १४.३, विंझर १४.३, आंबवणे १३.० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

इंदापूर, दौंड, पुरंदर भागात उघडीप

जुन्नरमधील वडगाव आनंद, बेल्हा, राजूर, आपटाळे, ओतूर, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, पारगाव भागात हलका पाऊस पडला. शिरूरमधील तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, बारामतीतील लोणी, सुपा, उंडवडी भागात शिडकावा झाला. तर इंदापूर, दौंड, पुरंदर भागातील बहुतांश सर्वच गावांत ढगाळ वातावरण राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT