Crop Loan Agriculture
ताज्या बातम्या

Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठ्याची गती संथच

औरंगाबाद वेळेत व पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा घोषणेपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रब्बीसाठी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्या अखेर केवळ १७.२० टक्केच कर्ज पुरवठा झाल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद वेळेत व पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा (Crop Loan Supply) करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा घोषणेपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रब्बीसाठी (Rabi Season) नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्या अखेर केवळ १७.२० टक्केच कर्ज (Crop Loan) पुरवठा झाल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ४३३७ कोटी २८ लाख २० हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी, व्यापारी तसेच ग्रामीण बँक मिळून सर्व बँकांनी २१ नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ ७८,५२३ शेतकऱ्यांना ७४५ कोटी ८० लाख १७ हजार रुपये कर्ज कर्जपुरवठा करत उद्दिष्टाच्या तुलनेत १७.२० टक्केच उद्दिष्ट पूर्ती केली आहे.

त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा वाटा ०.४५ टक्के, व्यापारी बँकांचा वाटा २३.४४ टक्के तर ग्रामीण बँकेचा वाटा १४.५२ टक्के इतका आहे. झालेल्या कर्ज वाटपात बीड जिल्ह्यात सर्वाधिक २३.२४ टक्के तर लातूर जिल्ह्यात सर्वात कमी ८.३३ टक्केच कर्ज पुरवठा झाला आहे.

खरिपात झालेले नुकसान सोयाबीन, कपाशी सह इतर पिकांच्या उत्पादनात आलेली घट पाहता शेतकऱ्यांना रब्बीसाठी वेळेत कर्ज पूर्ण होणे आवश्यक आहे. असे असताना शेतकऱ्यांना कर्जपुरवठा बाबत संथ असलेली बँकांची गती पुन्हा एकदा बँकांच्या अनास्थेकडे लक्ष वेधत आहे.

जिल्हा निहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा, तसेच टक्केवारी

जिल्हा: औरंगाबाद

उद्दिष्ट: ७४५ कोटी ४० लाख ८३ हजार

शेतकरी: ८८६१

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ७५ कोटी ६० लाख ३७ हजार

टक्केवारी : १०.१४

जिल्हा: जालना

उद्दिष्ट: ४८० कोटी दहा लाख ८४ हजार

शेतकरी: ७३७५

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ८१ कोटी ४६ लाख ३३ हजार

टक्केवारी : १६.९७

जिल्हा: परभणी

उद्दिष्ट: ६२४ कोटी ८१ लाख ६८ हजार

शेतकरी: १५ हजार ८९

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: १४५ कोटी २३ लाख ५१ हजार

टक्केवारी : २३.२४

जिल्हा: हिंगोली

उद्दिष्ट: ३७२ कोटी

शेतकरी: ९४८०

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ७३ कोटी २७ लाख ९६ हजार

टक्केवारी : १९.७०

जिल्हा: लातूर जिल्हा

उद्दिष्ट: ५७९ कोटी ३५ लाख

शेतकरी: ४४९२

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ४८ कोटी २५ लाख

टक्केवारी : ८.३३

जिल्हा: उस्मानाबाद

उद्दिष्ट: ५३१ कोटी ७८ लाख

शेतकरी: ६१७५

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ७५ कोटी ५९ लाख

टक्केवारी : १४.२१

जिल्हा: बीड

उद्दिष्ट: ४४० कोटी

शेतकरी: १३५७४

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: १३० कोटी ७८ लाख

टक्केवारी : २९.७२

जिल्हा: नांदेड

उद्दिष्ट: ५६३ कोटी ८१ लाख ८५ हजार

शेतकरी: १३४७७

प्रत्यक्ष कर्जपुरवठा: ११५ कोटी ६० लाख

टक्केवारी : २०.५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT