Crop Loan
Crop LoanAgrwoon

Crop Loan : सांगली जिल्हा बॅंकेकडून ३४६ कोटींचे कर्ज मंजूर

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज समितीच्या बैठकीत ३४६.०८ कोटींच्या अल्प व मध्यम मुदत कर्जास शनिवारी (ता. १९) मंजुरी देण्यात आली.
Published on

सांगली ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) कर्ज समितीच्या बैठकीत ३४६.०८ कोटींच्या अल्प व मध्यम मुदत कर्जास शनिवारी (ता. १९) मंजुरी देण्यात आली. यामध्ये चार साखर कारखान्यांना (sugar factory) दिलेल्या ३०८ कोटी रुपयांचा समावेश आहे. बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Crop Loan
Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

कर्ज समितीच्या बैठकीत २८ कोटी २९ लाखांची बिगरशेती कर्जे मंजूर केली आहेत. यामध्ये १०३ बचत गटांसाठी एक कोटी ५० लाख, मध्यम मुदत वाहन कर्जासाठी एक कोटी २३ लाख, पगारदार नोकरांच्या ४१ संस्थांसाठी दोन कोटी २८ लाख, बॅंक सेवकांना गृहबांधणीसाठी मुदत कर्जासाठी एक कोटी १५ लाख, दीर्घ मुदतीत शेतकऱ्यांना घर बांधणीसाठी पाच कोटी ६७ लाख, मालमत्ता तारणावर दोन कोटी ३२ लाख, थेट कर्जपुरवठाअंतर्गत संस्थेचे ग्रीन कॅश क्रेडिट चार कोटी, असा बिगरशेतीचा २८ कोटी २९ लाखांचा एकूण कर्जपुरवठा झाला आहे. शेतीकर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागांसाठी ३८६ सभासदांना ८ कोटी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com