Akola ZP Agrowon
ताज्या बातम्या

Akola ZP : निधी परत गेल्यावरून अकोला जिल्हा परिषदेची सभा गाजली

Government Fund : विकासकामांसाठी निधी नसल्याची एकीकडे बोंबाबोंब केली जात असताना दुसरीकडे आलेला निधी खर्च न झाल्याने परत गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Team Agrowon

Akola News : विकासकामांसाठी निधी नसल्याची एकीकडे बोंबाबोंब केली जात असताना दुसरीकडे आलेला निधी खर्च न झाल्याने परत गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

जिल्हा परिषदेचे सुमारे २१ कोटी रुपये परत गेले आहेत. शुक्रवारी (ता. २३) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा याच विषयावर गाजली. सर्वच विभागांचा निधी परत गेल्यामुळे सदस्यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर व डॉ. प्रशांत अढाऊ यांनी विकास कामांसाठी मिळालेला किती निधी अखर्चित राहिला, निधी अखर्चित राहण्यासाठी कोण जबाबदार आहेत, शासनाकडून निधी मिळाल्यानंतर सुद्धा निधी खर्च का होत नाही, असे प्रश्‍न उपस्थित केले.

त्यावर प्रत्येक विभाग प्रमुखांनी उत्तर द्यावे, अशी सूचना केली. सभेत उपस्थित प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. मिळालेला निधी, प्रत्यक्ष खर्च झालेला निधी व अखर्चित निधीची माहिती या वेळी विभागवार सादर केली. निधी मिळाल्यानंतर सुद्धा अधिकारी केवळ वेळकाढू कामे करतात. त्यामुळे जिल्ह्यात विकास होत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण समिती सभापती माया नाईक, कृषी समिती सभापती योगिता रोकडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रिजवाना परवीन, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, वंचितचे गटनेता ज्ञानेश्‍वर सुलताने, राम गव्हाणकर, शिवसेनेचे गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, सम्राट डोंगरदिवे, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर व इतरांची उपस्थिती होती.

विभागनिहाय परत गेलेला निधी

बांधकाम ५.३१ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा १३ लाख, पशुसंवर्धन ८.४२ कोटी, शिक्षण ५३.५२ लाख, लघुसिंचन ५७ लाख, समाज कल्याण ७३ लाख, महिला व बाल कल्याण २.१८ कोटी, आरोग्य २.९८ कोटी.

सभेत चर्चिले गेलेले मुद्दे

आरोग्य सेवांवरील खर्च, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजना, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ, खांबोरा ६४ खेडी योजना,भटोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT