Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा; कमाल तापमान ३५ , तर किमान १० अंशांखाली

राज्यातील तापमानातील तफावत कायम

Team Agrowon

पुणे : राज्याच्या हवामानातील (Weather) परस्पर विरोधी स्थिती कायम असल्याने तापमानातील तफावत कायम आहे.

गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा (Maximum Temprature) पारा पस्तीस अंशांपार गेलेला आहे.

तर काही ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेले काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाचा झळा असह्य होऊ लागल्या आहेत.

तर दुसरीकडे किमान तापमानातील घट कायम असल्याने पहाटेच्या वेळी गारठादेखील टिकून आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि अकोला येथे उच्चांकी ३७.२ अंश तापमान नोंदले गेले.

तर जळगाव येथे देशातील नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पारा देशातील नीचांकी ६.८ अंशांपर्यंत घसरला आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट कायम असून, धुळे आणि पुणे येथेही पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानात वाढ कायम आहे. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमान पस्तिशी पार आहे.

रत्नागिरी येथे ३७ अंश, तर वर्धा येथे ३६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव, सांगली, औरंगाबाद, परभणी, अमरावती, ब्रह्मपुरी, गोंदिया, वाशीम येथे पारा ३५ अंशांच्या वर होता.

गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३४.१ (९.४), जळगाव ३५.२ (८), धुळे ३४ (९.४), कोल्हापूर ३४.७ (१७.८), महाबळेश्‍वर ३०.५ (१५.९), नाशिक ३३.५ (१०.७), निफाड ३४ (६.८), सांगली ३५.३ (१६.२), सातारा ३४.७ (१५.४), सोलापूर ३७.२ (१५.३), सांताक्रूझ ३४ (-), डहाणू ३०.६ (१७.९), रत्नागिरी ३७ (२०.६), औरंगाबाद ३५ (११.७), नांदेड - (१५.८), परभणी ३५.५ (१४.५), अकोला ३७.२ (१३.९), अमरावती ३५.८ (१३.९), बुलडाणा ३३ (१६.२), ब्रह्मपुरी ३५.३ (१६.१), चंद्रपूर ३३.२ (१४.६), गडचिरोली ३२.६ (१२.६), गोंदिया ३२.५ (१३.२), नागपूर ३४.७ (१४.७), वर्धा ३६ (१५.९), वाशीम ३५.२ (१४.८), यवतमाळ ३४.२ (१४.५).

गारठा अधिक असलेली ठिकाणे :
निफाड ६.८, जळगाव ८.०, पुणे ९.४, धुळे ९.४.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
सोलापूर ३७.२, अकोला ३७.२, रत्नागिरी ३७, वर्धा ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT