Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : नववर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने

राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. आजपासून (ता. ३१) उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस गारठा वाढण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणे : राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर गेल्याने राज्यात थंडी (Cold) कमी झाली आहे. आजपासून (ता. ३१) उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात पुढील चार ते पाच दिवस गारठा वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. ३०) निफाडच्या गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी घट झाल्याने पारा ११ ते २० अंशांच्या दरम्यान होता. गेले काही दिवस सातत्याने उन्हाचा चटका कायम आहे. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या वरच आहे.

उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली राज्यात आज (ता. ३१) थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. ३०) पश्चिम उत्तर प्रदेशातील शाहझानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानसह ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहणार आहे.


शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९ (१३.४), जळगाव - (१४.६), धुळे ३१ (११.५), कोल्हापूर ३१.५ (१९.१), महाबळेश्वर २८.६(१५.७), नाशिक ३२.३ (१२.४), निफाड ३२ (१०.१), सांगली ३१.७ (१८.२), सातारा ३२.३(१६.९), सोलापूर ३५ (१८.९), सांताक्रूझ ३३.५(१८.२), डहाणू २८.८ (१७.३), रत्नागिरी ३५.२ (१९.७), औरंगाबाद ३१.६ (१२.७), नांदेड - (१७), उस्मानाबाद ३२ (१०.३), परभणी ३२.५ (१७.५), अकोला ३३.३ (१६.५), अमरावती ३२ (१४.३), बुलडाणा ३०.४ (१५.५), ब्रह्मपुरी ३२.४ (१५.३), चंद्रपूर ३०.२ (१६.६), गडचिरोली ३१.०(१५), गोंदिया २९.२(१२), नागपूर २९.६ (१३.३), वर्धा ३०.२(१४.९), यवतमाळ ३२ (१६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: ऊस एफआरपी, साखरेच्या एमएसपी प्रश्नी महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी आक्रमक, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

Farmer Protest: करपलेल्या सोयाबीनसह शासन निर्णयाची स्वाभिमानीकडून होळी

Irrigation Power Supply: एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यात ₹१,५०० जमा; ऑगस्ट हप्त्याच्या वितरणास सुरुवात

Poultry Farming Management: परसबागेतील कोंबडीपालनाची सूत्रे

SCROLL FOR NEXT