Grape Agrowon
ताज्या बातम्या

Grape Season : द्राक्ष हंगामाचे गणित वातावरणावर अवलंबून

दोन्ही जिल्ह्यांतील द्राक्ष पट्ट्यातील द्राक्ष हंगामाचे गणित येत्या काळातील वातावरणावर अवलंबून असेल, असे मत द्राक्ष उत्पादकांनी व्यक्‍त केले आहे.

टीम ॲग्रोवन

जालना / औरंगाबाद : दोन्ही जिल्ह्यांतील द्राक्ष पट्ट्यातील द्राक्ष हंगामाचे (Grape Season) गणित येत्या काळातील वातावरणावर (Climate) अवलंबून असेल, असे मत द्राक्ष उत्पादकांनी (Grape Farmer) व्यक्‍त केले आहे. अतिपावसाने काही बागांचा केलेला घात, लांबलेल्या छाटण्या याचाही किती परिणाम उत्पादकांच्या उत्पादनावर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काही शिवारातील द्राक्ष उत्पादनातील (Grape Production) घट ही मोठी असेल, असे शेतकरी सांगतात.

जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरुडी, बोरखेडी आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील सटाणा, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे.

द्राक्ष उत्पादक चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले, ‘‘ यंदा अतिपावसाने कडवंची शिवारातील २० ते ३० टक्‍के बागांना फटका बसला. काही अंशी वातावरण पोषक असले तरी यंदा कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या. टप्पेनिहाय झालेल्या छाटणीत जवळपास २० ते ३० टक्‍के बागा फुटल्याच नाहीत.

केवळ ३० ते ४० टक्‍के बागा बऱ्यापैकी फुटल्या. आता ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे डाऊनीचा प्रादूर्भाव आहेच. ’’ नंदापूरचे चव्हाण म्हणाले, ‘‘छाटण्या उशिरा झाल्याने हंगाम यंदा लांबण्याची शक्‍यता आहे.’’

‘थिनिंगवर भर, लोड कमी’

‘‘गेल्या हंगामात द्राक्षात अपेक्षित गोडी नव्हती. कदाचित घडांची व त्यामध्ये मण्यांची संख्या जास्त यामुळे गोडी नसावी म्हणून यंदा शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या अपेक्षित गळ न झाल्याने कृत्रिमरीत्या गळ होण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी थिनिंगही केली. त्यामुळे गोडी चांगली येण्याची आशा आहे,’’ असे द्राक्ष उत्पादक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले.

जानेवारीअखेरीस उत्पादन सुरू

कडवंची, नंदापूर शिवारातील द्राक्ष बागांमधील उत्पादन साधारणतः २६ जानेवारीनंतर सुरू होईल. औरंगाबाद जिल्ह्यातील सटाणा शिवारातही तीच स्थिती असेल. किमान १५ एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहील, अशी माहितीही द्राक्ष उतादक शेतकऱ्यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीत आमच्या शिवारातील ५ शेतकऱ्यांचे प्लॉट गेल्यात जमा आहेत. माझ्या बागेत १० टक्‍के कुज व १० टक्‍के घड जिरले. २५ ते ३० टक्‍के नुकसान झाले. उत्पादनात ४० टक्‍के घट येईल.
मोतीराम पळसकर, द्राक्ष उत्पादक, पळशी, जि. औरंगाबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT