Team Agrowon
फुलोरा अवस्था ही द्राक्ष पिकांमधील अतिशय महत्त्वाची अवस्था आहे. फुलोरा ते सेटिंग अवस्था ही साधारणपणे ५ दिवसांची असते.
या अवस्थेमध्ये मणी लाग, मणीजळ व मणीगळ या समस्या अधिक दिसून येतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट येते.
द्राक्ष बागेत प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे फुलोरादरम्यान होणारी मण्यांची गळ. मण्यांची जळ म्हणजे मणी रात्रीमध्ये जळून जातात.
या अवस्थेत एका घडामध्ये ५०० पेक्षा जास्त मणी लागतात. जीएचा वापर करून मणी लाग कमी करू शकतो.
बागेत हवा खेळती राहण्यासाठी कॅनॉपी कमी ठेवावी. काडीवरील सुरुवातीची पाने काढून टाकावीत. वांझ फुट्या काढून घ्याव्यात. त्यामुळे घडांची होणारी जळ थांबेल.
वेलीवर घडांची संख्या निर्धारित ठेवावी