Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक हवा

टीम ॲग्रोवन

नांदेड ः ‘‘नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच केंद्र सरकारमधील सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल. सहकार क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी सर्वांनीच व्यापक होणे आवश्यक आहे,’’ असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता १४) व्यक्त केले.

नांदेड शहरातील तरोडा नाका भागात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को - ऑप सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्‍घाटन पूर्णा रोड येथे शनिवारी (ता. १४) पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, अर्जुन खोतकर, कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगावकर, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधव किन्हाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ सहकार चळवळीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. शंभर वर्षापासूनचा मोठा इतिहास आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. आता बॅंकांचे क्षेत्र वाढले आहे. सहकारी बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्थाकडे बघण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टिकोन अधिक चांगला असायला पाहिजे. नांदेड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनातून प्रक्रिया करणारे उद्योग या भागात यायला हवेत. साखरेसह इतर उत्पादने साखर कारखान्यांनी सुरू केली त्याप्रमाणे आता सोयाबीन, हळद या पिकांकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकरी तसेच तरूण, महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’’

‘‘देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची मदत होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर सहकार क्षेत्राला आणखी बळकटी येईल,’’ असेही पवार म्हणाले.

सहकारात विश्वासार्हता, नेतृत्व महत्वाचे

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन भाषण केले. ते म्हणाले,‘‘सहकारात विश्वासार्हता आणि नेतृत्व महत्वाचे असते. महाराष्ट्र ही सहकार क्षेत्राची मातृभूमी आहे. ग्रामिण आणि कृषीच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक वृद्धीगंत होईल. त्याचबरोबर रोजगार आणि विकासासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, याचा विचार व्हायला हवा. नांदेडला देखील एक्सपोर्ट सेंटर भविष्यात होईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT