Summer Crops Agrowon
ताज्या बातम्या

उन्हाळ पिकांमध्ये कडधान्य, तृणधान्य, तेलबियांना पसंती

या उन्हाळ्यात तेलबिया लागवडीखालील क्षेत्र २.२ टक्क्यांनी वाढले असून ११.१७ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया घेण्यात आल्या आहेत. तृणधान्य लागवड क्षेत्रातही ९.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११.८६ लाख हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे.

Team Agrowon

उन्हाळ पिकांच्या लागवडीत यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य, तृणधान्य लागवडीसह तेलबियांनाही पसंती दिली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भुईमूग, मका, भातपीक लागवडीचे क्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांनी तृणधान्यात मूग, उडीद लागवडीवर भर दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळ पिकांच्या (Summer Crops) लागवड क्षेत्रात ५.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारपर्यंत (दिनांक २७ मे) यंदा ७६.४१ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या (Agriculture Ministry) माहितीनुसार, भातपीक (Paddy) आणि भुईमूग (Groundnut) वगळता अन्य प्रमुख पिकांच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३ टक्क्यांनी घटले आहे. या उन्हाळ्यात ३०.३३ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची (Paddy) लागवड करण्यात आली.

या उन्हाळ्यात तेलबिया (Oil Seeds)लागवडीखालील क्षेत्र २.२ टक्क्यांनी वाढले असून ११.१७ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबिया घेण्यात आल्या आहेत. तृणधान्य (Cereals) लागवड क्षेत्रातही ९.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११.८६ लाख हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्य लागवडीत गेल्यावर्षीच्या तुलनेत मक्याचे (Maize) क्षेत्र २.५ टक्क्यांनी घटले आहे. या उन्हाळ्यात केवळ ७.३६ लाख हेक्टर क्षेत्रात मका घेण्यात आला आहे.

या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी कडधान्य (Pulses) लागवडीस पसंती दिली असून २३.०५ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यातील कडधान्य लागवड क्षेत्रात १७.३ टक्के वाढ झाली आहे. कडधान्यांत शेतकऱ्यांनी मूग लागवडीस (१९.१६ लाख हेक्टर) प्राधान्य दिले असून मूग लागवडीखालील क्षेत्रात १५.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुगाबरोबरच उडीद लागवडीतही (३.६५ लाख हेक्टर) ३५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, तामिळनाडू आदी राज्यांत कडधान्य लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. मध्य प्रदेशात ९.०३ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात आली आहे. बिहारमध्ये ४.१६ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात आली आहे. ओडिशात २.६१ लाख हेक्टर, तामिळनाडूत २ लाख हेक्टर, उत्तर प्रदेशात १.५३ लाख हेक्टर, गुजरातमध्ये ९६ हजार हेक्टर, पश्चिम बंगालमध्ये ७३ हजार हेक्टर, पंजाबमध्ये ५२ हजार हेक्टर, आंध्र प्रदेशात ३५ हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये ३५ हजार हेक्टर आणि महाराष्ट्रात २६ हजार हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT