soybean rate  agrowon
ताज्या बातम्या

Soybean Theft : शेतात पोत्यांत भरून ठेवलेले दहा क्विंटल सोयाबीन चोरीला

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन जेमतेम पिकलेला शेतमाल हाती आला आहे.

टीम ॲग्रोवन

सिन्नर, जि. नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी (Soybean Crop Damage) होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे उत्पादनावर (Soybean Production) परिणाम होऊन जेमतेम पिकलेला शेतमाल हाती आला आहे. असे असताना काढणी केल्यानंतर तो आता चोरीला जाऊ लागल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या फुलेनगर येथील शेतकऱ्याला दहा क्विंटल सोयाबीन चोरीस गेल्याने सुमारे ५५ हजार रुपयांचा झटका बसला.

वावी निऱ्हाळे रस्त्यावर समृद्धी महामार्गालगत बाळासाहेब दशरथ लोंढे यांची शेती आहे. पावसाने पिकांची नासाडी झाली असली तरी जेमतेम राहिलेले सोयाबीनचे पीक त्यांनी काढणी करून तयार केले होते. शेतातच पोत्यांत भरून सोयाबीन त्यांनी साठवले होते. रविवारी (ता. ६) बाहेरगावी नातेवाईकांकडे अंत्यविधी असल्याने ते पत्नीसोबत गेले असताना संधी साधून त्याच दिवशी रात्री चोरट्यांनी लोंढे यांच्या शेतात पोत्यांत भरून ठेवलेले सुमारे दहा क्विंटल सोयाबीन वाहनातून चोरून नेले.

सोमवारी (ता. ७) सकाळी लोंढे शेतात गेल्यावर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. समृद्धी महामार्गापासून संरक्षक भिंतीच्या बाजूने चोरट्यांनी वाहन नेल्याचे खुणांवरून आढळले. लोंढे यांनी शनिवारी सोयाबीन काढल्यानंतर विक्रीसाठी काही दुकानदारांकडे सॅम्पल नेले होते. त्यानुसार साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची तयारी दुकानदाराने केली होती. त्यामुळे सोमवारी गावावरून परतल्यावर सोयाबीन विक्री करण्याचे त्यांचे नियोजन होते; मात्र त्याआधीच चोरट्यांनी ते चोरून नेले.

शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ

परिसरातील शेतकऱ्यांना ही बाब समजल्यावर शेतामध्ये तसेच खळ्यांवर पीक साठवण्यास शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. मका, सोयाबीन काढणीनंतर तातडीने सर्व शेतीमाल घराकडे आणण्याला किंवा थेट विक्री करण्याला शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: ऑनलाइन नोंदणी झाली; पण खरेदी केंद्रे आहेत कुठे?

Farmer ID: सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित

Cotton Harvest: कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

PM Kisan Yojana: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे ९ हजार रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे योजना?

Voter List: मतदार यादीतील त्रुटींवर वाद पेटणार? ‘एकगठ्ठा’ हरकतींना निवडणूक आयोगाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT