Wether Update
Wether Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : तापमानात चढ-उतार; चटका कायम

Team Agrowon

पुणे : राज्यात उन्हाळा हंगामाला (Summer Season) सुरुवात झाली आहे. कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे उन्हाचा चटका कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने थंडी कमी झाली असून, उकाड्यातही वाढ कायम आहे.

आज (ता. २) राज्याच्या कमाल तापमानातील वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यपासून राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला. कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने झळाही वाढत आहेत. बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश तापमानाची नोंद झाली.

तर अकोला, धुळे, वाशीम येथे तापमान ३७ अंशांवर होते. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे गेले आहे.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होतच आहे. बुधवारी (ता. १) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या पुढे असल्याने थंडी ओसरली आहे.


शनिवारपासून पावसाची शक्यता
पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात शनिवारपासून (ता. ४) हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर रविवारी (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.७ (१२.५), जळगाव ३५.७ (१३.७), धुळे ३५.५ (१३), कोल्हापूर ३४.२ (१९.१), महाबळेश्‍वर ३० (१६.६), नाशिक ३५.२ (१५.७), निफाड ३५.१ (११), सांगली ३४.४ (१८.४), सातारा ३४.२ (१६.४), सोलापूर ३६ (२०.९), सांताक्रूझ ३३.९ (१९.५), डहाणू ३२.४ (१८.७), रत्नागिरी ३३.९ (१९.२), छत्रपती संभाजीनगर ३४.३ (१४.९), नांदेड (२०.२), परभणी ३६.१(१८.३), अकोला ३७.३ (२०.१), अमरावती ३६.४ (१८.५), बुलडाणा ३५.४ (२०.४), ब्रह्मपुरी ३७.८ (१९), चंद्रपूर ३६.२ (१९.८), गडचिरोली ३३.६ (१६.२), गोंदिया ३५.५ (१८), नागपूर ३४.८ (१८), वर्धा ३५.५(१८.९), वाशीम ३७ (१७.४), यवतमाळ ३५.२ (२२).

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ३७.८, अकोला ३७.३, धुळे ३७, वाशीम ३७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT