Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : निफाड, धुळ्यात पारा १० अंशांखाली

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पुन्हा घट झाली असून, निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Temperature) चढ-उतार सुरूच आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पुन्हा घट झाली असून, निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. ३) राज्यात कोरड्या हवामानासह (Dry Weather), तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे. राजस्थानातील चूरू येथे शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभाव, किमान तापमानात झालेली वाढ, यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात आलेली गुलाबी थंडी ओसरली आहे. यातच दिवसा मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उन्हाचा चटका कायम आहे.

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ९.४ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे ९.५ तापमान नोंदविले गेले. तर रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, बहुतांशी ठिकाणी पारा ११ ते १९ अंशांच्या दरम्यान तर कमाल तापमान २८ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

सोमवारपर्यंत कमी दाब क्षेत्राची निर्मिती

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात उद्यापर्यंत (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बुधवारपर्यंत (ता. ७) ही प्रणाली तीव्र होऊन तामिळनाडू, पदुच्चेरीच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.७ (११.१), जळगाव ३०.८ (११.४), धुळे ३०.० (९.४), कोल्हापूर ३०.३ (१९.१), महाबळेश्वर २६.८(१४.९), नाशिक २८.७ (१२.०), निफाड २८.६ (९.५), सांगली ३२.१(१६.५), सातारा ३०.९(१६.७), सोलापूर ३२.८ (१७.७), सांताक्रूझ ३३.५(१८.८), डहाणू ३२.९ (१८.९), रत्नागिरी ३५.० (२०.३), औरंगाबाद २९.४ (१०.८), नांदेड ३२.० (१६.०), उस्मानाबाद - (१५.४), परभणी ३०.० (१३.८), अकोला ३०.७ (१३.५), अमरावती ३०.२ (१३.५), बुलढाणा २९.३ (१३.८), ब्रह्मपूरी ३२.२ (१५.७), चंद्रपूर २८.६ (१६.६), गडचिरोली ३२.२(१३.६), गोंदिया २८.८(१३.०), नागपूर २९.६ (१३.३), वर्धा २९.०(१४.०), यवतमाळ ३०.० (१३.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: दुष्काळाचा पहिला ट्रीगर २६५ तालुक्यांत लागू, दुष्काळी सवलती मिळणार; पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Rainfall Records: दुष्काळ मूल्यांकनासाठी पाऊस, पीकस्थितीच्या अचूक नोंदी घ्या; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आदेश

Water Restriction: सांगली जिल्ह्यात उपसाबंदी शिथिल

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू, शेतकऱ्यांना मदत, सवलती मिळणार- कृषिमंत्री भरणे

Sindhudurg Eco Sensitive Zone: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश

SCROLL FOR NEXT