Sugar Factory Award
Sugar Factory Award Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory Award : ज्ञानेश्वर साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

Team Agrowon

नगर ः भेंडे (ता. नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला (Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Cooperative Sugar Factory) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर (Sugar Factory Award) झाला आहे. हा पुरस्कार मिळविण्यात कारखान्यातील प्रत्येक घटकाचे योगदान असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केली.

साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे २०२१-२२ गळीत हंगामासाठीचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला मध्य महाराष्ट्र विभागातील तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.

२०२१-२२ गळीत हंगामात ११.३८ टक्के साखर उतारा, मागील दोन वर्षांच्या तुलनेत उताऱ्यात १.११ टक्के वाढ, गाळप क्षमतेचा ९९. ७३४ टक्के वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये ११.९९ टक्के वाढ, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९५.८४ टक्के या निकषावर हा पुरस्कार जाहीर झाला.

२१ जानेवारी रोजी व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

उत्कृष्ट नियोजन, कामगार, कर्मचारी यांच्या योगदानामुळे प्रतिदिन ७ हजार टन गाळप क्षमतेवर कार्यक्षेत्रातील १६ लाख ६० हजार ५४० टन उसाचे विक्रमी गाळप पूर्ण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT