Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon

Sugar Factory Election : ‘चोसाका’च्या २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल ः बिडवाई

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला.
Published on

चोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या (Chopada Cooperative Sugar Mill) २०२३-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत अक्षरशः अर्जांचा पाऊस पडला. यात २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक (Sugar Factory Election) निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली आहे.

Sugar Factory Election
Sugar Mill : केंद्राच्या लुडबुडीमुळे साखर कारखाने अडचणीत

भाडेतत्त्वावर गेलेल्या चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर दिला असला तरी या कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा चांगलाच उडणार असल्याचे संकेत ‘सकाळ’ने व्यक्त केले होते. अर्ज भरण्याचा गुरुवारी (ता. १२) शेवटचा दिवस होता.

Sugar Factory Election
Tanpure Sugar Mill : राहुरीचा ‘तनपुरे कारखाना’ जिल्हा बँकेच्या ताब्यात

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल झाले असून, निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

त्यात १५ जागा ऊस उत्पादक मतदारसंघात गटनिहाय उमेदवारी अर्ज असे ः गोरगावले - १४, अडावद - ११, चहार्डी -१७, हातेड - १७, चोपडा - १६ असे एकूण ७५, महिलांच्या दोन जागांसाठी १९, तसेच बिगर ऊस उत्पादक मतदारसंघात (सोसायटी) १५, अनुसूचित जाती, जमाती - १४, भटक्या व विमुक्त जाती जमाती - ९ आणि विमाप्र, इतर मागास प्रवर्ग - ३९, एकूण ९६ सर्व मतदारसंघ मिळून १७१ अर्ज दाखल झाले आहेत.

यात शुक्रवारी (ता. १३) छाननी आहे. ऊस उत्पादक मतदारसंघात सलग तीन वर्षे कारखान्यास ऊसपुरवठा केला पाहिजे, अशी अट असल्याने अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता

आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com