ZP School Agrowon
ताज्या बातम्या

ZP School Update : पटसंख्या टिकविण्यासाठी गुरुजींकडून विद्यार्थ्यांचा शोध

ZP Education : शहरी भागाबरोबर ग्रामीण पालकांना खासगी शाळांची भुरळ पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

Team Agrowon

Nandurbar News : शहरी भागाबरोबर ग्रामीण पालकांना खासगी शाळांची भुरळ पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पटसंख्या टिकवण्यासाठी शिष्यांच्या शोधात गुरुजींची भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतले आहेत. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शोधून त्यांना आपल्या शाळेत प्रवेश देण्यासाठी शोधा-शोध सुरू झाली आहे.

खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी शिक्षक ग्रुप करून विद्यार्थ्यांच्या शोध घेत आहेत. संस्थेने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने दिली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचीही या शाळेतून त्या शाळेत प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांच्या नामवंत शाळांकडे रांगा लागत आहेत. तर, अन्य शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकावे लागत आहे.

मराठी शाळांची दयनीय अवस्था

विद्यार्थीसंख्या दरवर्षी कमी होत असल्याने शाळा टिकविणे हे संस्थांचे उद्दिष्ट्य आहे. शिक्षक नोकरी टिकावी या अपेक्षेने त्यांनी विद्यार्थ्यांची शोधमोहिम सुरू केली आहे. यात अनेकांना यश येत असले, तरी प्राथमिक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थीसंख्येची वानवाच दिसून येत आहे. दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था बिकट होत चालल्याने पुढे मराठी शाळांचे भवितव्य काय? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

गुणवत्ता सुधारणे गरजेचे

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची मनधरणी करून शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. अनेक शाळांमध्ये पटसंख्या कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. दरवर्षी विद्यार्थी शोधण्यापेक्षा शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना आकर्षित केल्यास, दरवर्षी होणारी विद्यार्थ्यांची शोध मोहीम थांबण्यास मदत होईल. पटसंख्या वाढेल. असे मत ग्रामीण भागातील सुज्ञ पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT