Agri Student Protest Agrowon
ताज्या बातम्या

Agri Student Protest : कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे ‘पंदेकृवि’त ‘ताला ठोको’ आंदोलन

राज्यातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियंत्यांनी राज्य सेवा आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

Team Agrowon

Akola Student Protest News : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) कृषी अभियांत्रिकीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने महाविद्यालयाला कुलूप ठोकले.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत चर्चा केल्यानंतर महाविद्यालयाचे कुलूप उघडत कामकाज सुरळीत केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम कमी केल्याविरुद्ध २१ दिवसांपासून विद्यार्थी लढा देत आहेत.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियंत्यांनी राज्य सेवा आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सुरू असलेल्या कृषी अभियंता आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात सलग २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

शासनाचे, आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी विविध प्रकारची आंदोलने करीत आहेत. मात्र कुठलाही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन कायम आहे.

येथील आंदोलनात २५० ते ३०० विद्यार्थी ठिय्या देत आहेत. त्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु त्यांना ठोस तोडग्याची प्रतीक्षा आहे.

योग्य निर्णय होत नसल्यामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मागण्यांची दखल घेऊन आयोग व शासन लेखी स्वरूपात हमी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर सर्व ठाम आहेत.

मंगळवारी (ता. १४) आंदोलकांनी येथील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. त्या ठिकाणी घोषणा दिल्या. याची माहिती मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यार्थ्यांसोबत मागण्यांबाबत चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Waste to Energy Project: टाकाऊ सेंद्रिय घटकांपासून २०० युनिट वीजनिर्मिती

Genetic Alphabet: ‘डीएनए’च्या वर्णमालेत आणखी चार अक्षरांची भर!

Sustainable Economy: ध्येय सक्षम अन् शाश्‍वत अर्थव्यवस्थेचे

India Inflation: महेंगाई मार डालेगी

Rabi Season Crisis: बारामतीत खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात

SCROLL FOR NEXT