Eknath Davale Agrowon
ताज्या बातम्या

Orange Farming : संत्रा उत्पादकता, गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घ्या ः डवले

संत्रा उत्पादकांनी अधिक उत्पादनावर भर देण्यासोबतच निर्यातक्षम व उत्तम गुणवत्तेची फळे तयार करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

Team Agrowon

Orange Farming वाशीम ः ‘‘संत्रा उत्पादकांनी अधिक उत्पादनावर (Orange Production) भर देण्यासोबतच निर्यातक्षम (Orange Export) व उत्तम गुणवत्तेची फळे तयार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ग्राहकांना उच्च प्रतीची संत्रा फळे उपलब्ध करून दिल्यास बाजारपेठेत अधिक दर मिळू शकतील,’’ असे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले (Eknath Davale) यांनी केले.

श्री. डवले वडजी येथे आयोजित कार्यक्रमात संत्रा उत्पादकांसोबत बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागातर्फे वडजी येथे संत्रा उत्पादकांसाठी शुक्रवारी (ता.१७) चर्चासत्र झाले.

या वेळी विभागीय कृषी सहसंचालक के. बी. मुळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मारोतराव लादे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, ‘केव्हीके’चे उद्यानविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, तुषार देशमुख उपस्थित होते.

श्री. डवले यांनी संत्रा उत्पादकांसोबत चर्चा करीत ते अवलंबित असलेल्या उत्पादन तंत्राबद्दल माहिती घेतली. फळांची व बागांची उत्तम गुणवत्ता पाहून शेतकऱ्यांचे कौतुक केले.

‘केव्हीके’च्या मार्गदर्शनात संत्रा उत्पादक गटाद्वारे निर्मित वाण ‘वाशीम संत्रा’ या ब्रँडच्या नावाचे कौतुकही केले. सर्व प्रथम शंकरराव बोरकर, राजेश बोरकर, शिवाजी शेजूळ यांच्या संत्रा बागांची पाहणी करण्यात आली.

श्री. मुळे यांनी पॅकहाउस, शेततळे व फळबाग लागवड योजनांबद्दल मार्गदर्शन केले.श्री. तोटावार यांनी संत्रा शेती शाळा व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

श्री. पाटील यांनी केव्हीकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या संत्रा गटशेती उपक्रमाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

Parbhani Water Scarcity: चार लघू सिंचन तलाव आटले

Fertilizer Booking App : ऑनलाइन खत बुकिंगसाठी केंद्र सरकारचा निर्णय

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT