Farmers Protest Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीन दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चा मानवतमध्ये मोर्चा

कापूस, सोयाबीन दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. २३) मानवत येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

परभणी : कापूस, सोयाबीन दरप्रश्नी (Cotton Soybean Rate) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे )Swabhimani Shetkari Sanghatana) सोमवारी (ता. २३) मानवत येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. कापसाला खासगी बाजारात १२ हजार ३०० रुपये भाव स्थिर ठेवण्यात यावा. सोयाबीनचा भाव खासगी बाजारात ८ हजार ७०० रुपये स्थिर ठेवावा.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ आणि २०२२ या वर्षांतील प्रलंबित विमा भरपाई अदा करण्यात यावी. शेती कर्जासाठी ‘सिबिल’ची अट रद्द करण्यात यावी.

राज्य सरकारने प्रोत्साहन योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांची मदत तत्काळ देण्यात यावी. अतिवृष्टीबाधितांना राज्य सरकारने जाहीर केलेले प्रतिहेक्टरी १३ हजार‌ ८०० रुपये अनुदान तत्काळ देण्यात यावे.

या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मानवत येथे एल्गार मोर्चा काढला.

स्वाभिमिनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दामुआण्णा इंगोले‌, भगवान शिंदे, केशव आरमळ, विठ्ठल चोखट, हनुमान मसलकर, गजानन तुरे, भास्कर खटिंग, रामप्रसाद गमे, दत्तराव परांडे, श्रीकांत डासाळकर, उद्धव काळे, महादेव काळे, गोपाळ काळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT