Raju Shetty Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetty : ‘स्वाभिमानी’ ची उद्या जयसिंगपुरात ऊस परिषद

ऊसदराबाबत आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : गत हंगामातील एफआरपी (FRP) अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि या वर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व जादाचा दर या तीन मुद्द्यांवरून यंदाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghtna) २२ वी ऊस परिषद शनिवारी (ता. १५) जयसिंगपुरात होत आहे.

परिषदेची तयारी पूर्ण झाली असून, यात ऊसदराबाबत आंदोलनाची दिशा स्पष्ट करू, असा इशारा अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.१२) दिला. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य सरकारने सर्व गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत. ई-पीक नोंदणी, सातबारा असे सर्व ऑनलाइन असताना राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी तातडीने हे वजन काटे नियंत्रण ठेवण्यासाठी काटे ऑनलाइन करावेत.

साखर कारखानदार काटे मारतात असे म्हटल्यानंतर त्यांना राग येतो. मग आमचे काटे चोख आहेत. हे कोणता कारखानदार धडधडीतपणे का सांगत नाहीत. वजन काटे ऑनलाइन करा, अन्यथा हंगाम बंद पाडू.’’ ‘‘गेल्या वर्षीच्या उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन मागितले होते.

ती अद्याप मिळाली नाही. केंद्र सरकारच्या कोणत्याही परवानगीविना शासनाने एफआरपीत दोन तुकडे करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. सध्या बाजारपेठेत साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर मिळत आहे. तर दुसरीकडे अनुदानाशिवाय निर्यात झालेल्या साखरेला १५० ते २०० रुपये जादा मिळत आहेत. सरकारने साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी २० ते २५ टक्के इथेनॉलनिर्मिती केल्याचा फायदा कारखान्यांना झाला आहे.

त्याचबरोबर साखर आयुक्तांनी दोन वर्षांचे रिकव्हरी ऑडिट न केल्याने सध्या मिळणारी एफआरपी ही जुन्या दराची आहे. त्यामुळे तातडीने ऑडिट करून रिकव्हरी दर निश्‍चित करावा. अन्यथा, हंगाम मध्येच बंद पाडून सरकारला जाब विचारू,’’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी स्वागत केले. सावकर मादनाईक, सागर संभूशेट्टे, विठ्ठल मोरे, रामचंद्र शिंदे, राजेश पाटील, रामचंद्र फुलारे, सागर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘१ कोटी ३२ लाख टन ऊस चोरला’

राज्यात २०० कारखाने आहेत. त्यांच्या वजनातून १ कोटी ३२ लाख टन ऊस चोरला आहे. यातून गाळप केलेली साखर ही काळ्याबाजारात विक्री केली जाते. त्यामुळे सरकारची २२५ कोटी रुपयांची जीएसटी बुडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT