Cotton farmer agrowon
ताज्या बातम्या

Farmer Protest : कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, विभागीय कार्यालयावर फेकला कापूस

Cotton Production : कापसाचे दर पडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज अमरावती विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कापूस फेकून निषेध नोंदवला

Team Agrowon

Swabhimani shetkari sanghatna : केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून कापसाची गाठींचे मोठ्या प्रमाणात आता केल्याने राज्यातील कापसाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कापूस फेकून निषेध नोंदवला.

खरीप हंगामाच्या सुरुवात शेतकरी मोठा प्रमाणात कापूस बाजारात आणत आहेत. त्यामुळे कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या ७ हजार ते ७ हजार ६०० रुपये भाव मिळत आहे. जानेवारीमध्ये ९ हजार ते ८ हजार ५०० रुपयांवर बाजारभाव होते. पण केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून पिमा व गिझा प्रकारच्या (२८ मिलिमीटर लांब धागा व शुभ्रता) तीन लाख गाठींची आयात करण्यात येत आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ व प्रवीण मोहोड यांच्या नेतृत्वाखाली कापसाच्या दरावरून आज कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कापूस फेकून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी विभागीय आयुक्तांना निवदेन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशीची लागवड करून कापसाचे उत्पन्न घेत असतो. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन केलं आहे. मात्र यावर्षी कापसाचे भाव कमी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून असून योग्य दर नसल्याने शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र खरिपाची पेरणी करायची असल्याने शेतकऱ्याला कमी भावात कापूस विकावा लागत आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पन्न होत असूनही विदेशातून कापसाच्या गाठी सरकार आयात करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये १३ हजार रुपये क्विंटल कापसाला भाव दिला होता. त्याचप्रमाणे याही सरकारने भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT