इंदापूर ः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) जमिनींना तीन महिने वापसा नव्हता. यामुळे शेतीसाठी वीज (Agriculture Electricity) वापरण्याचा प्रश्नच येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विरोधात होते तेव्हा सांगत होते की मध्यप्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये भरले आणि शेतकऱ्यांना मोफत वीज दिली.
आता तेच सत्तेत बसले की पांढरे फिके होतात.कोणतेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्याचा बळी हा जाणारच आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या विजेला कोणी हात लावाल तर आम्ही कायदा हातात घेऊ,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी थेट आमदारांसमोरच ‘महावितरण’सह राज्य सरकारला दिला.
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न हा अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महावितरण’कडून सध्या इंदापूर तालुक्यात कृषिपंपांची वीज तोडणीची मोहीम सुरू आहे. शेतकऱ्याने थकबाकीसह चालू वीज बिले भरावीत, असा तगादा महावितरणकडून लावला जात आहे.
या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडत राज्य सरकारला थेट इशारा दिला. या वेळी अमरसिंह कदम यांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले.
‘खोक्याच्या सरकारकडून ओके कार्यक्रम’
कदम म्हणाले, ‘‘वीज कंपनीचा कोणताही अधिकारी वीज तोडण्यासाठी आला तर त्याच्या तोंडाला काळे फासू. तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते. खोक्याचे सरकार आमचा ओकेच कार्यक्रम करत आहे. यामुळे मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतो, की आमची वीज तोडू नका. आधी आमच्या उसाची बिले वेळेत द्या.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.