Snail Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Snail Crop Damage : गोगलगायींमुळे नुकसानग्रस्त पिकांचे होणार पंचनामे

Crop Damage Survey : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत.

Team Agrowon

Beed News : गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत. उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करता यावे, यासाठी मदत व पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी (ता. २३) संवाद साधला. त्यानंतर आज (ता.२४) सायंकाळपर्यंत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित होतील, असे श्री. मुंडे यांनी सांगितले.

मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

त्याची दखल घेत मुंडे यांनी रविवारी परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली. कृषिमंत्र्यांच्या या पाहणीत गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे स्पष्ट झाले.

परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी पिके आदी गोगलगायींमुळे प्रभावित झाली आहेत. त्याची मुंडे यांनी पाहणी बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवादही साधला. गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरीत्या उपलब्ध आहे.

त्याची किंमतही फार जास्त नाही. तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले.

दरम्यान या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे संचालक अजय मुंडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे आदी उपस्थित होते.

‘पिके तुडवू नका’

कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी व शेतकरी हे बांधावर आले होते. या वेळी श्री. मुंडे यांनी ‘पिके तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं आहे. आपल्या पायांनी आणखी त्यांचे नुकसान करू नका’’ अशा सक्तीच्या सूचना सर्वांनाच दिल्या.

कमी पावसाने सध्या पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकटही येऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील.
- धनंजय मुंडे, कृषिमंत्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT