Rabi Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : हंगामातील दुबार पिकासाठी बामणोली धरणाचा आधार

पनवेल तालुक्यातील जांभिवली गावात माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून जांभिवलीतील शेतकऱ्यांना दुबारा हंगामातील पिकांसाठी १५ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

रसायनी ः पनवेल तालुक्यातील जांभिवली गावात माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या बामणोली धरणातून (Bamnoli Dam) जांभिवलीतील शेतकऱ्यांना दुबारा हंगामातील पिकांसाठी १५ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे.

धरणाच्या पाण्यावर जांभिवली आणि बाजूच्या गावांतील शेतकरी दुबारा हंगामात भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. त्यामुळे जांभिवली परिसरात हरितक्रांती झाली आहे.

जांभिवली येथील बामणोली धरण ३९ वर्षांपूर्वी बांधले आहे. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आणि इतर आदिवासी वाड्यांतील शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतकरी बारमाही शेतात पीक घेत असल्याने विहीर, विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहते.

खरिपाच्या हंगामात भाताचे पिक घेतले जाते. सिंचन साधनाचा मोठा आधार मिळाल्‍याने दुबारा भाताचे तसेच भेंडी, काकडी, घोसाळी, कारली, शिरोळी, दुधी, मिरची, वांगी, टोमॅटो आदी भाजीपाल्यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जनावरांनाही बारा महिने हिरवा चारा मिळू लागल्‍याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Water Stock: खानदेशात जलसाठा घटू लागला

Loan Misuse: कर्जाचा गैरवापर; कारखान्यांवर कारवाई

Development Model: नाशिक जिल्ह्यात सामाजिक दायित्वावर आधारित विकासाला चालना

Rabi Irrigation Planning: कालवा दुरुस्तीसाठी पाणीवापर संस्थांना प्राधान्य

Fruit Orchard Cultivation: नांदेड जिल्ह्यात २५४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण

SCROLL FOR NEXT