Irrigation Scheme : कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर योजनेला मिळणार सुधारित मान्यता

जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कुऱ्हा -वढोदा - इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असून धरण बांधकामाची उर्वरित कामे व पाइपलाइनची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.
Irrigation
IrrigationAgrowon
Published on
Updated on

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कुऱ्हा -वढोदा - इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला (Irrigation Scheme) सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असून धरण बांधकामाची उर्वरित कामे व पाइपलाइनची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.

Irrigation
Irrigation : गडहिंग्लजमध्ये यंदा पाणी नियोजन ‘रामभरोसे’च

आमदार कुटे म्हणाले, की राज्यात २०१९ च्या सत्ता नाट्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघातील सिंचनाची अनेक कामे सरकारने बंद पाडली होती. त्यात याही प्रकल्पाचा समावेश होता. परंतु जुलै महिन्यात झालेल्या सत्तापालटानंतर आता सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देत सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू केला.

त्याचाच भाग म्हणून जेव्हा या उपसा सिंचन प्रकल्पाला केंद्रिय पर्यावरण विभागाच्या मान्यतेची गरज असल्याचे समजले, तेव्हा या विभागाचे केंद्रीय मंत्री जळगाव जामोद येथे १९ सप्टेंबरला आले असता त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकल्पाला त्वरित पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली.

Irrigation
Irrigation : कडेगाव कालव्याची दुरवस्था

तेव्हापासून आजपर्यंत प्रकल्पाबाबत असलेल्या अनेक अडचणी दूर करून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. या प्रकल्पाला येणाऱ्या कॅबिनेटमधे सुमारे २२२३.५३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

जिगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालगत असलेल्या गावात कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून, यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ५३ गावे, तर संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे समाविष्ट आहेत. सुमारे २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त सिंचन होणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनचा फायदा होणार आहे, याचा निश्चित आनंद आहे

-आमदार डॉ. संजय कुटे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com