Sunflower  Agrowon
ताज्या बातम्या

Sunflower Sowing : जळगाव जिल्ह्यात सूर्यफुल पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Sunflower Farming : गतवर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने यंदा सूर्यफूल पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तर कापसाला यंदाही पसंती कायम आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात ६ जुलैपासून अनेक भागात कमी व अधिक पाऊस झाला आहे. पेरण्या सुरूच असून, यंदा सूर्यफूल पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तर कापसाला यंदाही पसंती कायम आहे.

गुरुवार (ता. ६) पासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत ४९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. काही ठिकाणी पिके डोलू लागली आहेत. तब्बल एक महिना उशिराने पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रोज काहीना काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतात पिकांबरोबर तणही वाढत आहे. तण काढणे, काडीकचरा व धस वेचणे, अशी कामे शेतात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पिकांची वाढ अर्धा ते एक फुटापर्यंत झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी खतांच्या मात्रा देणेही सुरू केले आहे.

सूर्यफुलाकडे पाठ

नायजर सीड्स (आरोग्यदायी बिया), सूर्यफूल, इतर तेलबियांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. यामुळे सूर्यफूल उत्पादन कमी होईल, असे दिसत आहे. पण काही शेतकरी पुढील आठवड्यात पेरणी करतील. त्यामुळे क्षेत्र किंचित वाढेल, असाही अंदाज आहे.

कापूस ७२ टक्के

कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र पाच लाख एक हजार ५६८ हेक्टर आहे. आतापर्यंत तीन लाख ६१ हजार ७५९ हेक्टरवर अर्थात, ७२ टक्के कापसाचा पेरा झाला असून, हा पेरा अधिक आहे. यात बागायती कापसाचा पेरा ५० टक्के आहे. कोरडवाहू कापूस २२ टक्के असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा...

तालुका---पेरण्या (हेक्टरमध्ये)--टक्केवारी

जळगाव--२५ हजार २६--४४

भुसावळ--१२ हजार ५०१--४३

बोदवड--३३ हजार २९०--५८

यावल--आठ हजार ७००--२०

रावेर--१६ हजार ५७०--५६

मुक्ताईनगर--१४ हजार ५६६--४९

अमळनेर--५० हजार ०८९--७२

चोपडा--३३ हजार ९७६--५३

एरंडोल--२९ हजार ९९०--७६

धरणगाव--१९ हजार २६७--४३

पारोळा--४० हजार ६८३--७८

चाळीसगाव--३४ हजार ३७०--४०

जामनेर--६८ हजार १९--६८

पाचोरा--२८ हजार ४५०--४९

भडगाव--११ हजार १६८--३२

एकूण--चार लाख १२ हजार ५४२--५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT