Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Summer Heat : उन्हाचा चटका असह्य

कमाल तापमानाचा पारा पस्तिशीपार गेल्याने राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानही घसरत असल्याने गारठा कायम आहे.

Team Agrowon

Summer Heat Update पुणे : कमाल तापमानाचा (Minimum Temperature) पारा पस्तिशीपार गेल्याने राज्यात उन्हाळ्याची (Summer Heat) चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानही घसरत असल्याने गारठा (Cold Weather) कायम आहे.

कमाल-किमान तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा तर दुपारी उन्हाच्या झळा अशीच स्थिती अनुभवायला मिळत आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. शनिवारी (ता. ११) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.५ अंश तर जळगाव येथे १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

आजपासून (ता. १२) राज्याच्या किमान तापमानाचा पारा काही अंशी घसरण्याची शक्यता आहे.

निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान पस्तिशीपार गेले असल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

अकोल्यासह धुळ्यात तापमान ३७ अंशांवर, तर सोलापूर, अमरावती, वर्धा येथे तापमान ३६ अंशांवर पोचले आहे.

कमाल आणि किमान तापमानात १५ ते २८ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा असह्य होत आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. ११) पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता.१२) आसाम, अरुणाचल प्रदेशात विजांसह पावसाची शक्यता आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.० (११.५), जळगाव ३५.८ (१०.०), धुळे ३७.०(८.५), कोल्हापूर ३४.०(१८.६), महाबळेश्वर ३०.७ (१६.४), नाशिक ३४.७ (१०.९), निफाड ३५.८ (७.२), सांगली ३५.५ (१६.१), सातारा ३४.४ (१४.२), सोलापूर ३६.० (१६.३),

सांताक्रूझ ३३.८ (१८.०), डहाणू ३१.२ (१५.८), रत्नागिरी ३४.०(१७.५), औरंगाबाद ३४.५ (१३.२), नांदेड ३४.६ (१५.६), परभणी ३५.६(१५.०), अकोला ३७.३ (१४.६), अमरावती ३६.२(१४.३), बुलडाणा ३३.०(१६.८),

ब्रह्मपुरी ३५.४ (१४.५), चंद्रपूर ३३.६(१५.४), गडचिरोली ३२.४(१२.४), गोंदिया ३३.८ (१४.०), नागपूर ३५.८ (१३.६), वर्धा ३६.७(-), यवतमाळ ३५.० (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT