Livestock Agrowon
ताज्या बातम्या

Livestock Act : ‘पशूधन, पशुजन्य उत्पादने’कायद्याबाबत मागविल्या सूचना

Import Export : केंद्र सरकार येत्या काळात पशूधन आणि पशुजन्य उत्पादने आयात-निर्यात कायदा संमत करणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

Team Agrowon

New Delhi News : केंद्र सरकार येत्या काळात पशूधन आणि पशुजन्य उत्पादने आयात-निर्यात कायदा संमत करणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने या कायद्याच्या मसुद्यातील सुधारणेसाठी पशुपालक, आयातदार आणि निर्यातदारांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. याबाबत मंत्रालयाचे सह सचिव जी. एन. सिंग यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

१८९८ मध्ये ब्रिटिशांनी पशूधन आयात कायदा तयार केला. त्यानंतर केंद्र सरकारने २००१ मध्ये त्यामध्ये सुधारणा करून पशूधन आयात सुधारित कायदा संमत केला. त्यानुसार परदेशातून पशूधन आयात करताना जैव सुरक्षिततेवर भर दिला.

त्यामुळे परदेशी पशूधन आणि पशुजन्य उत्पादनातून आपल्या देशात येणाऱ्या रोगांचे संक्रमण रोखले गेले. येत्या काही दिवसात केंद्र सरकार पुन्हा एकदा या कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. त्यानुसार या कायद्याचे नाव ‘पशूधन आणि पशुजन्य उत्पादने आयात-निर्यात कायदा-२०२३’ असे होणार आहे.

दरम्यान, या कायद्यामुळे देशातील पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. या कायद्याचा मसुदा मंत्रालयाच्या संकेत स्थळावर (https://dahd.nic.in/) उपलब्ध आहे. या मसुद्याबाबत पशुपालक, आयातदार आणि निर्यातदारांना सूचना करायच्या असतील तर त्यांनी त्या संकेतस्थळावर दिलेल्या इमेलवर पाठवाव्यात, अशी माहिती श्री. सिंग यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT