Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labuor : ऊसतोडणी कामगारांचा गुरुवारी पुण्यात मोर्चा

पाच लाखांचा विमा काढावा, महामंडळाचे ओळखपत्र मिळावे, या सह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे गुरुवारी (ता. २२) पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : पाच लाखांचा विमा (Sugarcane Labourer Insurance ) काढावा, महामंडळाचे ओळखपत्र मिळावे, या सह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे (Sugarcane Labourer Organization) गुरुवारी (ता. २२) पुणे येथील साखर आयुक्त (Sugar Commissionerate) कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘‘हंगाम सुरू होण्यापूर्वी या मागण्या मान्य न केल्यास कोयता बंद आंदोलन केले जाईल,’’ असा इशारा संघटनेतर्फे डॉ. सुभाष जाधव यांनी दिला.

डॉ. जाधव म्हणाले, ‘‘ऊसतोडणी कामगार, गाडीवान, मुकादम, ऊस वाहतूक मालक वाहतूकदार यांच्या अनेक वर्षे मागण्या प्रलंबित आहेत. यंदाचा गळीत हंगाम दीड महिन्यात सुरू होईल. अद्याप ऊसतोडीसह इतर कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. वारंवार मागणी करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी गुरुवारी (ता. २२) मोर्चा काढला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातून हजार, तर राज्यातून पाच हजार कामगार सहभागी होतील.’’

...या आहेत मागण्या

गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे ऊसतोड कामगार, गाडीवान, मुकादम व वाहतूकदार यांची नोंद करावी

यंदाच्या हंगामात महामंडळाचे ओळखपत्र मिळावे

कामगारांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा व वैद्यकीय खर्च देण्याची योजना मिळावी

मुला-मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT