Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Bill : थकित रक्कम न मिळाल्यास ऊस उत्पादक करणार ‘आत्मक्लेश’

Baramati Agro : २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत रक्कम न मिळाल्यास येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘चोसाका’चे उपाध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Team Agrowon

Jalgaon News : चहार्डी (ता. चोपडा) येथील बारामती ॲग्रोने शेतकऱ्यांचे २०१४-१५ चे राहिलेले १५० रुपये प्रतिटन प्रमाणे ३ कोटी ३० लाख रुपये जून २०२३ ला देऊ, असे सांगितले होते, पण अजूनही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करतील, असा इशारा कृती समितीने दिला आहे.

२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत रक्कम न मिळाल्यास येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘चोसाका’चे उपाध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखर कारखाना विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी डॉ. रवींद्र निकम, डॉ. सुभाष देसाई, भागवत महाजन, मेहमूद बागवान आदी होते. कृती समितीचे एस. बी. पाटील पुढे म्हणाले, की कारखाना बुडविला कुणी? १०० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी केले का? बारामती ॲग्रो सोबत करार केला कुणी? जर करार मंजूर नव्हता तर बारामती ॲग्रोकडून ५० कोटी घेईपर्यंत १२ टक्के व्याज आठवले नाही का? स्वतःच्या गळ्यावरील सुरी उतरल्यावर बारामती ॲग्रो वाईट कशी झाली? शेतकऱ्यांना व कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले असते तर लगेच कारखाना बुडणार होता का? करार करताना कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला? आज देखील करारात बऱ्याच त्रुटी आहेत.

त्या कोणत्या यावर कुणीच बोलत नाही. बारामती ॲग्रोला कारखाना भाडेतत्त्वावर देण्याआधी बंटी शेठ (इंदूर) म्हणजे हाजी अजीज कंपनी यांना पैसे घेण्याआधीच कोर्टात पैसे मिळाले, अशी डिक्री करून देऊन ३० लाखांचे तीन डीडी मिळाले. मात्र त्यातील ५० लाख गायब कुणी केले, असा प्रश्‍न केला.

कारखाना डबघाईला असताना २०१५ पासूनचा मीटिंग भत्ता २०२२ मध्ये वाढवून घेऊन बारामती ॲग्रोकडून आलेल्या पैशांमधून लाखो रुपये संचालकांनी वाटून घेतले, तेव्हा १२ टक्के व्याजदराने होणारे नुकसान कारखाना कसा फेडेल, याचा विसर का पडला?, असेही ते म्हणाले.

बिनव्याजी दिलेल्या पैशांचे काय?

बारामती ॲग्रोकडून १२ टक्केने पैसे घेताना संचालकांना व कार्यकारी संचालक यांना बिनव्याजी लाखो रुपये दिलेत, तेव्हा संस्था वाचणार नाही, असे कुणालाही का वाटले नाही? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत २०१४-१५ चे राहिलेले १५० रुपये प्रतिटन प्रमाणे ३ कोटी ३० लाख रुपये २ ऑक्टोबरपर्यंत न दिल्यास आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT