Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : ऊस शेती प्रशिक्षणाला २० डिसेंबरपासून सुरुवात

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) राज्यव्यापी ‘ऊस शेती ज्ञानयाग’ व ‘ऊस शेती ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण शिबिरांना येत्या २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) (व्हीएसआय) राज्यव्यापी ‘ऊस शेती ज्ञानयाग’ व ‘ऊस शेती ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षण (Sugarcane Farming Training) शिबिरांना येत्या २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

ऊस व साखर उत्पादकता वाढविण्यासाठी पुरूष शेतकऱ्यांसाठी ‘ज्ञानयाग’ तसेच महिलांसाठी ‘ज्ञानलक्ष्मी’ असे निवासी प्रशिक्षण उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित केला जात आहे. महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण २० ते २३ डिसेंबर दरम्यान राहील, असे ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी कळविले.

२७ ते ३० डिसेंबर दरम्यान विदर्भ व कोल्हापूरमधील पुरूष शेतकऱ्यांसाठी ज्ञानयाग असेल. ३ ते ६ जानेवारी सांगली, सातारा, तर १० ते १३ जानेवारी दरम्यान पुणे, नगर, नाशिकसाठी ज्ञानयाग होईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात १७ ते २० जानेवारी दरम्यान सोलापूर, मराठवाडा व खानदेशातील शेतकऱ्यांसाठी ज्ञानयाग भरविला जाईल.

या उपक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांना ऊसशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासहित मिळेल. त्यासाठी तीन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले जाते. शेतकऱ्यांनी या उपक्रमाच्या माहितीसाठी www.vsisugar.com या संकेतस्थळावर किंवा ०२०-२६९०२२६८, ९८९०४२२२७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कडू-पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवग्यातील तेजी टिकून; मेथीचे दर टिकून, सिताफळ दरात नरमाई, गाजराला उठाव तर मुगाचा भाव दबावातच

Sandeep Deshpande on Ashish Shelar: आशिष शेलारांच्या मतदारसंघात देवळाचा पत्ता देऊन बोगस मतदारांची नोंदणी?,'मनसे'कडून पोलखोल

Rupali Thombre Patil: रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा निर्णय!

Rural Development: पांगरी महादेवमध्ये अखेर प्रशासनाची पाहणी

Smart Agriculture: शेती व्यवस्थापनात होतील आमूलाग्र बदल

SCROLL FOR NEXT