Anil Jadhao
जालना जिल्ह्यात मागील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना देण्याची वेळ आली होती.
यंदा ही जिल्ह्यात तब्बल ४४ लाख तीन हजार १५०.४५ टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचा अहवाल प्रदेश साखर आयुक्तालयाचा आहे. त्यामुळे यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
जालना जिल्ह्यात सहकार आणि खासगी असे पाच साखर कारखाने आहेत. यापैकी सध्या चार साखर कारखाने सुरू झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील या पाच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा ४४ लाख तीन हजार १५०.४५ टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.
सर्वाधिक तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १४ लाख चार हजार ५६० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.
अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट एकच्या कार्यक्षेत्रात दहा लाख नऊ हजार ३६० टन ऊस आहे.