Sugarcane cultivation
Sugarcane cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ५२ हजार हेक्टरवर ऊस लागवड

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीचा (Sugarcane Cultivation) हंगाम आटोपला आहे. आता पूर्व, सुरू हंगामातील लागवड करण्यासाठी गती येणार आहे. आजअखेर ५२ हजार ५७९ हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane Farming) झाली असून, त्यापैकी ४२ हजार ६२७ हेक्टरवर आडसाली उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामातही उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या हंगामात पूर येण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीचे नियोजन काहीसे पुढे ढकलले होते. त्यातूनही पूर पट्टा वगळता इतर भागांत ऊस लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले. परंतु सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे ऊस लागवडीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ऊस लागवडीचा वेग कमी झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी वाफसा पाहून ऊस लागवड करण्यास प्रारंभ केला. वाळवा तालुक्यात २१ हजार २९६ हेक्टरवर आडसाली ऊस लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील आडसाली हंगामातील ऊस लागवडीचा कालावधी आटोपला आहे. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, खानापूर, तासगाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात प्रामुख्याने पूर्व, सुरू हंगामातील ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढाकार घेत असतो. आता पूर्व, सुरू हंगामातील ऊस लागवडीसाठी शेतकरी नियोजन करत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत पूर्व हंगामी ७ हजार ५३७ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात यंदाही अपेक्षित पाऊस झाला आहे. त्यातच भूजल पातळीतही वाढ झाली आहे.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका आडसाली पूर्वहंगामी सुरू खोडवा

मिरज ३८०२ -- -- --

जत ३७.७ १५३०.८ -- ७९६

खानापूर २८३० -- -- --

वाळवा २१२९६ ११९६ -- --

तासगाव २७२५ -- -- --

शिराळा १३२० १५५० -- ४५०

आटपाडी ३६२ २५ -- --

कवठेमहांकाळ ३२० ११६७ -- --

पलूस ४६२३ २०६९ -- ११६८

कडेगाव ५३१८ -- -- --

एकूण ४२६२७.७ ७५३७ -- २४१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT