Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद १५ ऑक्टोबरला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यंदाच्या ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबरला जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे ऊस परिषद होणार आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यंदाच्या ऊस हंगामाची (Sugarcane Season) दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबरला जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे ऊस परिषद (Sugarcane Meet) होणार आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ही माहिती दिली.

खतांचे आणि मजुरीचे वाढलेले दर आणि साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)ची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी ९ ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन या बाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे.

शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर २७०० ते २९०० इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेत जी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे.

तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. हे सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल.

या बाबत प्रबोधन करण्यासाठी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान राबवले जाणार आहे. महाविकास आघाडीने एकरकमी एफआरपी न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. नव्या सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द केले. फक्त एकरकमी एफआरपीचा निर्णय रद्द केला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे आहेत, असे शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT