Sugarcane Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labors : कारखाने सुरू, मात्र ऊसतोडणीला अडथळा

जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात साखर कारखाने सुरू झाले असल्याने ऊसतोड मजुरांनी साखर कारखान्यावर स्थलांतर केले, मात्र गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने ऊसतोडणीला अडथळे येत आहेत.

टीम ॲग्रोवन

नगर ः जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात साखर कारखाने (Sugar Mill) सुरू झाले असल्याने ऊसतोड मजुरांनी (Sugarcane Workers) साखर कारखान्यावर स्थलांतर केले, मात्र गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने ऊसतोडणीला अडथळे येत आहेत. ऊसतोडणी करता येत नसल्याने कारखाना परिसरात आलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. ऊसतोडणी होत नसल्याने अनेक कारखान्याच्या परिसरात मजुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील शंभराहून अधिक कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांश कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. राज्यात यंदाही गतवर्षीप्रमाणे उसाचे क्षेत्र अधिक आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा साधारणपणे पंधरा दिवस आधी मजुरांना घर सोडावे लागले.

मात्र गेल्या आठ दिवसांपासून नगर, सोलापूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात सातत्याने पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने ऊसतोडणी करता येत नाही. साखर कारखाने सुरू झाले असले तरी ऊसतोडणी करता येईना. मजुरांनी तर कारखाना परिसर, कार्यक्षेत्रात बिऱ्हाड मांडले, मात्र पावसामुळे ऊसतोडणी सुरू झाली नसल्याने मजुरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

शेवगावातील गंगामाई साखर कारखान्याला ऊसतोडणीसाठी आलेल्या व नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे दहा ते बारा मजुरांच्या कुटुंबांनी राहुट्या मांडल्या. या मजुरांनी सांगितले की, आम्ही येथे येऊन पाच-सहा दिवस झाले. मात्र पावसामुळे शेतात पाणी असल्याने ऊसतोडणी सुरू होईना. खर्चाची अडचण झाली, कामाचे दिवसही वाया जाऊ लागले. त्यामुळे स्थानिक पातळीवर कामे शोधत आहोत. आम्हाला येथे आणले मात्र साखर कारखान्याकडून दखल घेतली जात नाही. ऊसतोडणी बंद असल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

पाऊस, गारठ्याशी सामना

नगर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याचे मजूर ऊसतोडणीसाठी कारखान्याने बोलावले आहे. मात्र पाऊस, गारठा याच्याशीही मजुरांना सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे. टायर गाडीवर काम करणारे साखर कारखाना परिसरात तर डोकी व गाडी सेंटरचे मजूर ज्या भागात ऊस तोडायचा त्या भागात राहुट्या करतात.

सध्या सर्वच पाणी, दलदल, चिखल आहे. अशाच ठिकाणीच राहुट्या टाकाव्या लागत आहे. मजुरांना मुकादम अथवा साखर कारखान्यांकडून कुठल्याही सुविधा देत नसल्याने कठीण प्रसंगाशी सामना करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Farm Productivity: उत्पादकता वाढली तर भाव पडतील?

Agriculture Scheme Evalution: मोल मूल्यमापनाचे!

Farmer Protest: पाणी भरलेल्या सोयाबीन शिवारात शेतकऱ्याचे आंदोलन

Soil Conservation: मृद्‌संधारणाच्या कामासाठी कृषी अधिकारी कासावीस

SCROLL FOR NEXT