Sugar Rate agrowon
ताज्या बातम्या

Sugar Rate : भविष्यात साखरेचे संकट, जागतिक साखर संस्थेकडून आकडेवारी जाहीर

World Sugar Organization : जागतिक साखर संस्थेकडून (ISO) ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबरपासून साखर उत्पादन घटणार असल्याची माहिती देण्यात आली.

sandeep Shirguppe

Sugar Rate News : जागतिक साखर संस्थेकडून (इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन, ISO) ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबरपासून साखर उत्पादन घटणार असल्याची माहिती देण्यात आली. यंदाच्या २०२३-२४ हंगामात जागतिक साखर उत्पादनात १.२३ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे, बाजाराला २.११८ दशलक्ष टन (MT) तुटवडा पडणार आहे. यामुळे येणाऱ्या काळाता साखर उत्पादनाबाबत सरकारला सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ISO ने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये या हंगामात १७७.०२ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन १७४.८४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर साखरेचा वापर १७६.५३ दशलक्ष टनांवरून १७६.९६ दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे यंदाच्या हंगामात 0.493 दशलक्ष टनांच्या अधिशेषाच्या तुलनेत 2.118 दशलक्ष टनांची तूट निर्माण झाली आहे. यामुळे आगामी हंगामात भारतासारख्या साखर उत्पादक देशामध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने जागतिक साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे.

दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी होणार

यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा आतापासूनच बसत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा कमी पावसाने कोल्हापूर वगळता राज्यातील ऊस पट्ट्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी ऊस कापून घालण्यास सुरूवात केली आहे.

जनावरांना ऊस कापून घालण्याचे काम सुरू झाल्याने त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम आगामी साखर हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत साखर उद्योगातील तज्ज्ञांनीही असा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन यंदाच्या १०५ लाख टनांवरून ९० लाख टनांपर्यंत येण्याची शक्यता आहे. याबाबत चिनी मंडीने वृत्त सादर केले आहे.

आकडेवारी काय सांगते?

२०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १३७ लाख टन होते. यंदा ते १०५ लाख टनांवर आले. २०२३-२४ च्या हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ऊस पट्ट्यात पाऊस न पडल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होऊन १०३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. WISMA सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नवीन अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान AgriMandi.live कडून राज्यातील पावसाची सद्यस्थिती, पिकांची वाढ आणि भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT