Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Stock : कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसा खतसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यात ४ सप्टेंबरअखेर पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात ४ सप्टेंबरअखेर पुरेसा खतसाठा (Fertilizer Stock Kolhapur) उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली. या कालावधी अखेर युरिया (Urea) १४९९७ टन, डीअेपी २४०५ टन,एमओपी २४९९ टन, संयुक्त खते १४४९० टन व एसएसपी ५१३९ टन अशी एकूण ३९५३० टन खते उपलब्ध आहेत. कृषी विभागाने (Department Of Agriculture) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत २९०० टन युरिया, ५३१ टन डीएपी बफर स्टॉकमधून (Fertilizer Buffer Stock) वितरित केले आहे.

रासायनिक खतांची खरेदी करताना तक्रारी असतील तर संबंधित तालुका कषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तक्रार नोंदवावी. शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी राज्याचा १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. गरजेनुरूप तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हास्तरावर ९०४९४५४६४९ किंवा ७३८५९९०५९३ या नंबरशी संपर्क साधावा. रायायनिक खते खरेदी करताना ती अधिकृत, किरकोळ विक्रेत्याकडून पीओएस मशीनवरून व खरेदीच्या पक्या पावतीसह खरेदी करावीत.

शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रनिहाय उपलब्धता समजावी यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी विकसित केलेल्या ‘कृषिक’ ॲपची मदत घेता येते. तरी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये ‘कृषिक’ ॲप डाऊनलोड करून घ्यावे. ‘कृषिक ॲप’मधील ‘खत उपलब्धता’ या पर्यायावर क्लिक केल्यास कृषी केंद्रनिहाय खत उपलब्धता समजेल. आपल्या भागात कोणत्या किरकोळ विक्रेत्याकडे कोणत्या प्रकारचा किती खतसाठा त्या दिवशी उपलब्ध आहे. यासाठी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी adozpkop.blogspot.com या ब्लॉगस्पॉटवर माहिती उपलब्ध करून दिली आहे. या ब्लॉगस्पॉटवरूनदेखील माहिती करून घ्यावे. जिल्ह्यात युरियासह सर्व ग्रेडची खते उपलब्ध असून, नवीन खते उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असे श्री. पांगरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Argentina Agriculture : भारत आणि अर्जेंटिनामध्ये करार; तेलबिया, कडधान्यासाठी दोन्ही देश संयुक्त संशोधन करणार

Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश

Maize Procurement: कन्नड तालुक्यात ६६१ नोंदण्या झाल्या पूर्ण

Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर

Vertical Farming : शहरी भागातील उभ्या शेतीला जपानच्या तंत्रज्ञानाची साथ?

SCROLL FOR NEXT