Fertilizer : लिंकिंगला विरोध करताच तपासणी मोहीम

खरिपात गरज असलेल्या खतासोबत अनावश्यक खते बळजबरीने देऊन लिंकिंग होत असताना आणि विचारणा केली तर गरजेचे खतही न देण्याची भूमिका घेतली जात असल्याने त्रासलेल्या किरकोळ खत विक्रेत्यांनी अखेर बंड केले.
Fertilizer
Fertilizer Agrowon

नगर ः खरिपात (Kharif Season) गरज असलेल्या खतासोबत अनावश्यक खते बळजबरीने देऊन लिंकिंग (Fertilizer Linking) होत असताना आणि विचारणा केली तर गरजेचे खतही (Fertilizer) न देण्याची भूमिका घेतली जात असल्याने त्रासलेल्या किरकोळ खत विक्रेत्यांनी (fertilizer Seller) अखेर बंड केले. त्याची सुरुवात शेवगाव तालुक्यातून झाली. आता नेवासा, पाथर्डी, जामखेड, पारनेर, श्रीरामपूर आदी तालुक्यांतील खत विक्रेतेही लिंकिंगविरोधात एकवटले असून, एक दिवसाचा बंद पाळून खत लिंकिंगचा निषेध करण्यात येणार आहे.

दरम्यान, खत लिंकिंगला विरोध करणाऱ्या दुकानदारांना जाणीवपूर्वक वेठीस धरून कृषी विभागाने बुधवारी (ता. २४) तातडीने पत्र काढून दुकाने तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. होत असलेल्या खत लिंकिंगबाबत मात्र कृषी विभागाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत.

Fertilizer
Fertilizer : खत परवाना कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

आवश्यक खतासोबत अन्य अनावश्यक खताची होणारी लिंकिंगचा त्रास सहन न झाल्याने नगर जिल्ह्यात सर्वप्रथम शेवगाव तालुक्यात खत विक्रेत्यांनी खत लिंकिंगला विरोध करत बुधवारी (ता.२४) एक दिवस बंद पाळून निषेध केला. विक्रेत्यांच्या बंडाबाबत बुधवारी (ता. २४) ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रकाशित केले. त्यात खत लिंकिंग होत असताना भरारी पथके काय करतात, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे परिणाम कृषी विभागात पडसाद पाहायला मिळाले.

अनेक महिन्यांपासून सर्रासपणे लिंकिंग होत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने लिंकिंगबाबत ब्र देखील न काढता खत विक्रेत्यांची दुकाने तपासणी करण्याचे तालुका पातळीवर आदेश दिले. तालुका पातळीवरही अत्यंत दक्षतेने पुढील कारवाईला सुरुवात केली. खताच्या होत असलेल्या लिंकिंगबाबत मात्र कृषी विभाग बोलायला तयार नाही.

Fertilizer
Fertilizer : ‘एक खत’ समस्या अनेक

खत लिंकिंग होऊ नये, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये ही कृषी विभागाची जबाबदारी कृषी विभागाची आहे. नगर जिल्ह्यात मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून सर्रासपणे आवश्यक खतासोबत अनावश्यक खताची लिंकिंग होत असताना कृषी विभाग दुर्लक्ष करत होता. आता थेट किरकोळ खत विक्रेत्यांनी बंड पुकारल्यानंतर कृषी विभागाच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यातूनच दुकाने तपासणी मोहीम उडाल्याचे एका दुकानदाराने सांगितले.

ठोक, किरकोळ विक्रेत्यांत दरी

शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतासोबत नको असलेले खतही विक्रेत्यांच्या माथी मारले जात असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. किरकोळ विक्रेत्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन लिंकिंग विरोधात भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अशातच यावरून किरकोळ विक्रेते आणि ठोक विक्रेते यांच्यात दरी निर्माण झाल्याचे एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com