Rabbi Season
Rabbi Season  Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : रब्बीत हरभऱ्याला पर्याय राजमा, मसूर, मोहरी

Team Agrowon

अकोला ः रब्बी हंगामात (Rabi Season) घेतल्या जाणाऱ्या पिकांचे अर्थशास्त्र अभ्यासल्यास त्यामध्ये राजमा हे पीक (Rajma Crop) आजच्या स्थितीत सर्वाधिक पैसा मिळवून देणारे ठरू शकते. तर सर्वाधिक क्षेत्रावर पेरल्या जाणाऱ्या हरभऱ्याचे उत्पादन आज खर्चाच्या तुलनेत कमी आहे. उलट नफा मिळवून देण्यात राजमा, मसूर, मोहरी, सूर्यफूल या सारखी पिके पुढे आहेत.

या बाबत वाशीम जिल्हा कृषी विभागाने स्थानिक पीकपद्धतीने, उत्पादन खर्च, संबंधित पिकांची आधारभूत किमत याचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तफावत प्रामुख्याने अधोरेखित होत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात रब्बी हंगाम म्हटला की हरभरा हेच प्रमुख पीक बनलेले आहे. रब्बीत गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, राजमा, करडई, जवस, मोहरी, सूर्यफूल असे पर्याय आहे. यातील काही पिकांचे पूर्वी क्षेत्र मोठे होते.

काळानुरुप सूर्यफूल, मोहरी, जवस, मसूर या पिकांचे क्षेत्र कमी होऊन हरभरा अव्वल बनला. यामागे सहज उपलब्ध असलेले काढणी तंत्रज्ञान, कमी श्रम तसेच इतर विविध कारणे आहेत. आता हे पीकसुद्धा किडरोगांच्या तडाख्यात सापडू लागले. प्रामुख्याने मर रोगाचा सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसत आहे.

या अनुषंगाने शेतकऱ्यांनी दरवर्षी पिकाच्या जागेचा फेरपालट करण्याचा सल्ला दिला जातो. पण क्षेत्र कमी राहणाऱ्यांना हा पर्यायसुद्धा तितका उपयोगी पडत नाही. या कारणांमुळे शेतकऱ्यांनी पिकबदलाचा आग्रह आता केल्या जात आहे. पिकाचा उत्पादन खर्च, बाजार मूल्य व नफा याचा ताळेबंद तपासून पाहण्यास सांगितले जाते.

कृषी विभागाने तयार केलेल्या रब्बी पिकाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास यात राजमा हे पीक सध्या सर्वाधिक परवडणारे दाखवण्यात आलेले आहे.राजमा पिकाला एकरी उत्पादन खर्च हा १७००० रुपयांपर्यंत लागतो. एकरी उत्पादकता कमीत कमी सात क्विंटल गृहीत धरल्यास व बाजारभाव ७५०० ते ८५०० दरम्यान मिळाल्यास ५१ हजारांचे पीक होते. त्यात १७ हजार रुपये खर्च वजा जाता एकरी ३४ हजार रुपये निव्वळ नफा राहू शकतो. हरभऱ्याला एकरी उत्पादन खर्च किमान १६५०० रुपये लागतो.

हरभऱ्याचे उत्पादन किमान ८ क्विंटल गृहीत धरल्यास आधारभूत किमतीनुसार ४१८४० रुपयांचे उत्पादन येते. यात खर्च वजा जाता २५३४० रुपये मिळू शकतात. परंतु हे उत्पादन व आधारभूत किमतीने दर मिळाला तरच शक्य आहे. वास्तविक बाजारात सध्या हरभऱ्याला याहीपेक्षा कमी दर मिळतो आहे. त्यामुळे निव्वळ नफ्याचे प्रमाण आणखी कमी होण्यास वाव आहे.

पीक उत्पादन खर्च एकरी उत्पादन हमीभावाप्रमाणे उत्पन्न निव्वळ नफा

गहू १६००० १८ ३६२७० २०२७०

रब्बी ज्वारी १५००० १२ ३५६४० २०६४०

हरभरा १६५०० ८ ४१८४० २५३४०

मसूर १३५०० ८ ४४००० ३०५००

राजमा १७००० ६ ५१००० ३४०००

करडई १२८०० ७ ३८०८७ २५२८७

जवस १२४०० ६ ३०३०० १७९००

मोहरी १५००० ८ ४०४०० २५४००

सूर्यफूल १५००० ७ -४४८०० २९८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT