Agriculture Startup Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Startup : व्यावसायिक कल्पनेमध्ये नावीन्यपूर्तता असल्यास स्टार्टअपला फायदा

व्यावसायिक कल्पनेमध्ये नावीन्यपूर्तता असल्यास स्टार्टअपला त्याचा फायदा होतो. त्यामुळे नावीन्यपूर्ण कल्पना असल्यास स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. बी. वडतकर यांनी केले.

टीम ॲग्रोवन

अकोला ः व्यावसायिक कल्पनेमध्ये नावीन्यपूर्तता असल्यास स्टार्टअपला (Agriculture Startup) त्याचा फायदा होतो. त्यामुळे नावीन्यपूर्ण कल्पना असल्यास स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Krushi Vidyapith) कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. बी. वडतकर यांनी केले. येथील पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाउंडेशनच्या पुढाकाराने अॅग्री स्टार्टअपसाठी ३० ऑगस्टला क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे होते. तर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. बी. वडतकर हे होते.

मार्गदर्शक म्हणून कंपनी सचिव राम ठक्कर, सी. ए. मिथुन टेकाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पिडीकेव्ही रिसर्च व इन्क्युबेशन फाउंडेशन संचालक डॉ. एस. आर. काळबांडे यांनी या फाउंडेशनला जुळलेल्या ॲग्री स्टार्टअपसाठी केले होते. सूत्रसंचालन महेंद्रसिंह राजपूत यांनी केले. डॉ. मुरूमकार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT