Onion Market  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू करावी

‘नाफेड’मार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी याबाबत मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : ‘नाफेड’ (NAFED) मार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी याबाबत मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.

राज्य सरकारमार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ ‘नाफेड’मार्फत योग्य त्या किमतीत कांदा खरेदी सुरू करावी, अशा आशयाच्या निवेदनाद्वारे डॉ. पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील कळविले आहे.
राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आहे.

याचा परिणाम भावावर होत असून दर घसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना फटका बसत असून कमी किमतीत विक्री करावे लागत आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन ‘नाफेड’मार्फत तत्काळ कांदा खरेदी करण्याबाबत मागणी केली होती.

याची दखल घेत डॉ. पवार यांनी मंत्री गोयल यांच्या निदर्शनास ही मागणी आणून दिली.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग,  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.

कांद्याची खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत प्रचलित बाजार दरांनुसार खुल्या लिलावाद्वारे केली जाते.

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत २०२२ मध्ये ३५१ कोटी रक्कमेचा २ लाख ३८ हजार १९६ टन कांदा खरेदी करण्यात आला होता.

यात सरासरी १४७५ प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. या वर्षीदेखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने ‘नाफेड’मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी डॉ. पवार यांनी गोयल यांच्याकडे केली आहे.

यावर तत्काळ ‘नाफेड’मार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी मंत्री गोयल यांनी दिल्याचे डॉ. पवार यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT