Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : नांदेड जिल्ह्यात तुरळक पाऊस

जिल्ह्यात मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील सोयाबीन व कपाशी पिकांना फटका बसला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात मागील वीस दिवसापासून पावसाने (Nanded Rain Update) दडी मारल्यामुळे खरिपातील सोयाबीन (Kharif Soybean) व कपाशी (Cotton) पिकांना फटका (Crop Damage) बसला आहे. कडक उन्हामुळे पिके वाळत (Crop Dried Due To Heat) असल्याने आता दमदार पावसाची (Heavy Rainfall) गरज असताना मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला आहे. रविवारी किनवट मध्ये बऱ्यापैकी झालेला पाऊस सोमवारी मात्र काहीसा मंदावला.

जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसल्याने जिल्हा प्रशासनाने ७१८ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. दरम्यान अतिवृष्टीतून काही प्रमाणात शिल्लक असलेली पिकं मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने वाळत आहेत.

जिल्ह्यात शनिवारी काही भागात पावसाने हजेरी लावली. यात किनवट तालुक्यातील मांडवा मंडळात ७४.८० तर उमरी बाजार मंडळात ७४.८० मिलिमीटर पाऊस झाल्याने या मंडळात अतिवृृष्टीची नोंद झाली. यासोबतच किनवट मंडळात ४६.८०, माहूर मंडळात ४५.६०, सिंदखेडमध्ये ४५.५०, दहेली ४३.३०, सिंदगी ४०.३०, विष्णुपुरी ४० मिलिमीटर पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर मंदावला.

या दिवशी कुरुळा २९.५०, जाहूर २९.५०, कापसी २५.५०, तळणी ११.३०, माळाकोळी १६.५० व जांब मंडळात १४.३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ८८०.७० मिलीमीटरनुसार १३०.४९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT