Gram Panchayat Elections
Gram Panchayat Elections Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : उपसरपंचपद निवडणुकीला वेग

टीम ॲग्रोवन

नगर ः जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक (Gram Panchayat Election) झाली. सरपंचपदाची निवड (Sarpanch Election) जनतेतून असल्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकीला आता वेग आला आहे. विजयी उमेदवारांची नावे राजपत्रामध्ये येत्या २३ रोजी प्रकाशित होणार आहेत. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने एका आठवड्यात उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर- डिसेंबरअखेरीस कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश होता. सदस्यांसह सरपंचांची निवडदेखील थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

उमेदवारी अर्जमाघारी मुदतीच्या अखेरीस २०३ पैकी आठ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडले गेले. उर्वरित १९५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. प्रशासनाने मंगळवारी (ता. २०) मतमोजणी केली. त्यात काही ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागले.

ग्रामपंचायत सदस्यांमधून उपसरपंचांची निवड केली जाणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांना या पदासाठी मतदानाचा अधिकार राहणार आहे. वर्ग-दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक होणार आहे. गावपातळीवर प्रतिष्ठेचे म्हणून या पदाला महत्त्व आहे. उपसरपंचपदासाठी गावोगावी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT