Navin Patnayak
Navin Patnayak Agrowon
ताज्या बातम्या

Navin Patnayak: ओडिशात महिला शेतकऱ्यांसाठी खास योजना

Team Agrowon

महिलांचा शेतीक्षेत्रात (Womans in Agriculture) खूप महत्वाचा वाटा राहिलेला आहे. कुटुंब असो समाज असो की देशाचं आरोग्य, सामाजिक विकास (Socil Development) या सगळ्यात महिला सक्षमीकरणाला (Woman Impowerment) महत्व प्राप्त झालंय. जर महिलांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायला मिळालं तर त्या पूर्ण क्षमतेने काम करू शकतील. सोबतच श्रमशक्तीमध्ये योगदान देत निरोगी मुलांचे संगोपनही करू शकतील. 

कृषी क्षेत्रातील महिलांच्या याच कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ३६७ कोटी रुपयांचा निधी जाहीर केलाय. २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीतील "कृषीक्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण : महिला उद्योजकतेला प्रोत्साहन" या योजनेसाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

ओडिशा सरकारने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की, "राज्याला स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. यातून मशरूम उत्पादक महिलांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश आहे. शिवाय, या योजनेमुळे महिला लाभार्थ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळेल आणि योजनेच्या कालावधीत ओडिशा मशरूम आणि उच्च मूल्याच्या फुलांचे निर्यातदार म्हणून पुढे येईल."

तसेच ओडिशा सरकारने बटाटा, भाजीपाला आणि मसाला पिकांच्या विकास योजनेसाठीही सुमारे ११४२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे. बटाटा, कांदा, मसाले यांसारख्या गोष्टींसाठी राज्याचे इतर राज्यांवरचे अवलंबित्व कमी होऊन राज्य स्वयंपूर्ण व्हावं असा उद्देश या योजनेमागे आहे.  मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांना नुकतीच मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT