Soybean Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Production : सोयाबीनचे उत्पादन पावसाअभावी घटणार

Kharif Crop : खरीप हंगामातील ९३.३८ टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाअभावी जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात खरीप हंगामातील ९३.३८ टक्के पेरणी झाली आहे. आता पावसाअभावी जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. पुढील काळात लवकर पाऊस न झाल्यास पिके हातची जाणार आहेत. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसणार असून, ५० टक्के उत्पादन घटण्याची भीती आहे.

खरीप हंगाम सुरू झाल्यापासून जिल्ह्यात यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. यंदाचा खरीप हंगाम संकटातूनच सुरू झाला आहे. पावसाने उशिरा सुरुवात केली, त्यामुळे पेरण्या उशिरा सुरू झाल्या. कमी पावसातही पेरण्या केल्याने पिकांची उगवण कमी झाली होती.

त्यानंतर पाऊस झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणीस गती आली. या हंगामात ९३ टक्के पेरणी झाली आहे. सर्वाधिक सोयाबीनची ८० हजार हेक्टरवर पिकाची पेरणी झाली. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढ व भरणीवर परिणाम झाला आहे.

यामुळे सध्याच्या परिस्थितीत ५० टक्के उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. पुढील काळात पाऊस न झाल्यास खरिपातील सर्वच पिके जाण्याची भीती आहे. अनेक गावांत एक महिन्यापेक्षा अधिक काळ पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता

दसरा, दिवाळीला आधार ठरणाऱ्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या हंगामात उत्पादन आणि दर दोन्ही नसल्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी घट होणार आहे. पाऊस नाही आणि कडक ऊन यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पावसाची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT